ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कंटेन्मेंट झोनमधील सर्व दुकानं बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2020 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कंटेन्मेंट झोनमधील सर्व दुकानं बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स

शहर : देश

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार कंटेन्मेंट झोन परिसरातील सर्व दुकान बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर कंटेन्मेंट झोन बाहेरील दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना फक्त आवश्यक असल्यास घराबाबेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ज्या दुकांनांमध्ये जास्त गर्दी असते अशा दुकानांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गाईडलाईन्सचे निर्देश अंमलात यावे यासाठी आरोग्य मंत्रालय मार्केटच्या ओनर असोसिएशनसोबत चर्चा करणार आहे

गाईडलाईन्सनुसार, सर्व दुकानदारांना दुकान उघडण्याआधी दररोज संपूर्ण दुकान सॅनेटाईज करणं अनिवार्य राहील. याशिवाय दुकानाच्या ज्या भागात ग्राहकांची सारखी ये-जा किंवा रेलचेल असते असा भाग दिवसभरातून अनेकवेळा सॅनेटाईज करण्याचा आदेश देण्यात आला, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येईल.

सार्वजनिक शौचालये, पणीपोयी असलेल्या ठिकाणी दररोज दोन ते तीन वेळा स्वच्छता करावी. ज्या ठिकाणी लोकांची दररोज रेलचेल असते अशा ठिकाणीही सॅनेटाईज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन व्हावं यासाठी मार्केट असोसिएशनने नव्या समितीची स्थापन करावी, असे निर्देश गाईडलाईन्समध्ये देण्यात आले आहेत. कोणत्याही बाजारात नियमांचं योग्य पालन होताना दिसलं नाही तर तो बाजार बंद करण्यात येऊ शकतो, असा इशाराही गाईडलाईन्समध्ये देण्यात आला आहे.

 

मागे

हे सगळं काही धक्कादायक, अनपेक्षित; डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची प्रतिक्रिया
हे सगळं काही धक्कादायक, अनपेक्षित; डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची प्रतिक्रिया

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आ....

अधिक वाचा

पुढे  

पॅन कार्डमध्ये घर बसल्या स्वत:च करु शकता हे बदल, जाणून घ्या
पॅन कार्डमध्ये घर बसल्या स्वत:च करु शकता हे बदल, जाणून घ्या

पॅन आणि आधार नंबरशी (PAN-Aadhaar linking) लिंक करणं अनिवार्य आहे. कोरोना वायरसच्या प्राद....

Read more