ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 09:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

शहर : virar

आपल्या मित्राबरोबर निर्जन स्थळावर बोलत बसलेल्या मुलीच्या मित्राला झाडावर बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका नराधमाला विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर सदर आरोपी आपल्या गावी अकलूजला हा लपला होता. तिथून त्याला पोलिसांनी पकडून आणलं आहे. त्याचा एक साथीदार मात्र फरार आहे. त्याला पकडण्यासाठी विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे.15 एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान विरारच्या जीवदानी रोडवरील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या मागील सुनसान रस्त्यावरून 15 वर्षाची पीडित मुलगी आपल्या मावस बहिणीकडे जात होती. तेवढ्यात तिला तिचा मित्र भेटला. ते दोघे बोलत असताना दोन अज्ञात इसमांनी पीडित मुलीच्या मित्राला मारहाण करत झाडाला बांधून ठेवलं.
त्या मुलीला झुडपात नेवून तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. विरार पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष टीम स्थापन केली आहे.
घटनास्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने तसेच काहीच पुरावा नसल्याने आणि अंधारात मुलीने आरोपींना नीट बघितलं नसल्याने पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यात अडचणी येत होत्या. मात्र खबरीमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या आरोपींचा शोध लागला. त्यातील एक आरोपीला पोलिसांनी अकलूज येथून अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अजून फरार आहे.  लवकरच तो पकडला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मागे

सणसवाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट; 4 जण जखमी
सणसवाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट; 4 जण जखमी

रांजणगाव येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत होत्याचे नव्हते झाले. तालुक्....

अधिक वाचा

पुढे  

गोरेगावमध्ये धावत्या बसला आग
गोरेगावमध्ये धावत्या बसला आग

                                                        &nbs....

Read more