ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ट्रोल करताना सावधान! पंतप्रधान, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 07:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ट्रोल करताना सावधान! पंतप्रधान, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई

शहर : देश

राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अशा देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोटो जाहिरातीत वापरल्यास अथवा मिम्स, ट्रोल केल्यास आता मोठी कारवाई होऊ शकते.  केंद्र सरकारकडून प्रतिक कायद्यात काही बदल करण्यात आले आहेत. (Emblems and Names (Prevention of improper use) Act 1950) या बदलांनंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या फोटोंचा चुकीचा वापर केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. अशा प्रकारच्या पहिल्या चुकीवर 200 पट दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा फोटो खासगी कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये सर्रास वापरला जातो. त्यामुळे आता सरकारने प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो वापरण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याअंतर्गत 1950 च्या कायद्यानुसार, शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सात दशकांपूर्वीच्या जुन्या कायद्यात दुरुस्तीचा मसुदा तयार केला असून त्याबाबत जनमत जाणून घेण्यात आले. कायदा मंत्रालयाने या मसुद्याला सहमती दर्शविली आहे आणि जनमत घेतल्यानंतर हा मसुदा मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. सध्याच्या कायद्यात अशा प्रकारच्या चुकीवर 500 रुपये दंडाची तरतूद आहे. नव्या कायद्याअंतर्गत हा दंड 200 पटीने वाढवून एक लाख रुपये करण्यात आला आहे.

सरकारने जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरणाऱ्या देशातील दोन बड्या कंपन्यांना (रिलायन्स जिओ आणि पेटीएम) 2017 मध्ये नोटीस पाठवलं होतं. तसेच, या कंपन्यांवरदंडही ठोठावण्यात आला होता. यानंतर काद्यातही बदल करण्यात आला आहे. कारण जुना दंड कमी असल्याने कुणालाही त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तयार केलेल्या नव्या आराखड्यात पहिल्यांदा या नियमाचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड ठेवण्यात आला आहे. तर एक पेक्षा अधिकवेळा या नियमाचं उल्लंघन केल्यास पाच लाख रुपयाचा दंड आकारला जाईल. कारण, सात दशकांपूर्वीच्या कायद्यात असलेला दंड हा सध्य़ाच्या दृष्टीने अत्यंत कमी होता. त्याशिवाय, या नियमाचं वारंवार उल्लंघन केल्यास तीन ते सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

 

मागे

राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास होणार आरामदायी
राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास होणार आरामदायी

राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. कारण ए....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात
शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात पोहोचले आहेत. शरद प....

Read more