ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भर पावसात मिठी नदी कचऱ्याच्या विळख्यात

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 03:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भर पावसात मिठी नदी कचऱ्याच्या  विळख्यात

शहर : मुंबई

 महानगर पालिका दरवर्षी नालेसफाई वर करोडो रूपयांचा खर्च करत असते. मात्र हा खर्च नेमका होतो कुठे? हे कळतच नाही. कॅग ने ही हयाबदल प्रश्न उपस्थित केले आहेत. तरीही अजूनही महानगर पालिकेचे डोळे उघडल्याचे दिसत नाही.

नवा आग्रीपाडा सांताक्रूझ येथे  मिठी नदीतून नालेसफाई करून काढलेला गाळ व कचरा त्याच अवस्थेत विमान तळ सरक्षक भिंतीजवळ मिठी नदीच्या काठावर ढीग करून भर पावसात अजूनही तसाच पडून आहे. विमान तळ सरक्षक भिंतीलाही अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे ह्या परिसरात पाणी साचले आहे .ह्या अगोदरही गेल्या मागील आठवड्यात या भगत गुडगाभर पाणी साचले  होते. स्थानिक राजकीय प्रतींनिधी भेटी देत असले तरीही काहीही प्रतिक्रिया देत नसल्यामुळे व  महानगर पालिकेच्या अश्या अनागोंदी कारभारामुळे नगरिकांमद्धे संतापाची लाट आहे.

 

 

पावसामुळे 2 दिवस मुंबई भरली होती तरीही अजूनही महानगर पालिकेला नागरिकांच्या जिवाची व मुंबई ची काहीच काळजी असल्याचे दिसत नाही. द्स्तुरखुद्द मुंबई महानगर पालिकेच्या महापौरांचा हा वॉर्ड असूनही ह्या परिसरात अश्या प्रकारे नालेसफाईची वास्तवता आहे तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल ह्या प्रश्नच उत्तर नागरिकांनीच शोधाव . 

मागे

मुसळधार पावसाने गोवंडीत घर तर अधेरीत भिंत कोसळली
मुसळधार पावसाने गोवंडीत घर तर अधेरीत भिंत कोसळली

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळ पासूनच मुसळधार पावसाळा सुरवात झाली त्यामुळे अने....

अधिक वाचा

पुढे  

एअर चीफ मार्शल रशियाच्या दौर्‍यावर
एअर चीफ मार्शल रशियाच्या दौर्‍यावर

भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धनोआ 9 ते 12 जुलै दरम्यान रश....

Read more