By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 10:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठीत बोलण्याची विनंती केल्याने अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सराफाविरोधात लेखिका शोभा देशपांडे यांचा कालपासून रस्त्यावरच ठिय्या सुरु आहे. मुंबईतील कुलाब्यात घडलेल्या या प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. "महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास लाज वाट असेल त्यांना आम्ही आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ," असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसंच मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या महिलेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल, असंही ते म्हणाले.
कालपासून ठिय्या सुरु केलेल्या शोभा देशपांडे रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचून त्यांची विचारपूस केली.
दुकानदाराने लवकरात लवकर माफी मागावी : संदीप देशपांडे
वयोवृद्ध महिलेला मराठी बोला हे सांगण्यासाठी इथे आंदोलन करावं लागलं ही महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे. पोलिसांनी हे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळलं आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. या माजलेल्या दुकानादाराला जर पोलीस किंवा सरकार सरळ करणार नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने शिकवणी द्यावी लागेल. पोलीस संरक्षणासाठी आहेत, दमदाटीसाठी नाहीत. हा विषय अतिशय गंभीर आहे. ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आम्ही मराठीची शिकवणी देऊ आमच्या स्टाईलने हे त्यांनी यापुढे लक्षात ठेवावं. दुकानदाराने लवकरात लवकर माफी मागायला हवी, असं संदीप देशपांडे म्हणाले.
काय आहे प्रकरण?
शोभा रजनीकांत देशपांडे काल (8 ऑक्टोबर) दुपारी त्या कुलाब्यातील ससून डॉक परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीत संवाद साधत होते. मात्र त्यांनी मराठीत बोलावे अशी त्यांना विनंती केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच मात्र देशपांडे यांना दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाच्या बाहेर ढकलून दिलं. यामुळे दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केल्याचा आरोप करत त्या काल दुपारपासून या दुकानासमोरील रस्त्यावर ठिय्या देऊन बसल्या आहेत. जोपर्यंत त्या ज्वेलर्स आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण इथेच ठिय्या देऊन झोपून राहणार असल्याची भूमिका देशपांडे यांनी घेतली आहे.
देशात कोरोनाचा (Corona) धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. रोज नव्याने क....
अधिक वाचा