ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मातोश्रीबाहेर मनसेची पोस्टरबाजी,पोस्टरमधून शिवसेनेला मनसेचं आव्हान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 07, 2020 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मातोश्रीबाहेर मनसेची पोस्टरबाजी,पोस्टरमधून शिवसेनेला मनसेचं आव्हान

शहर : मुंबई

मुंबईतल्या वांद्रे पूर्व भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मनसेनं पोस्टर लावले आहेत. देशातल्या घुसखोरांआधी वांद्र्यातले घुसखोर हलवा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आलं आहेगुरुवारी रात्री हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

या फलकावर माननीय मुख्यमंत्री साहेब पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकलंलच पाहिजे, हिच आपली भूमिका असेल तर प्रथम आपल्याच वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असा मजकूर लिहिण्यात आलाय. त्यामुळे घुसखोरांवरून शिवसेना मनसेत वाद रंगण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री त्यांनी वांद्रे येथील अंगणातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करावेत. या अशा आशयाचे पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री मुंबतील वांद्रे पूर्वेत मातोश्रीच्या बाहेर लावले. परिणाम वांद्रे परिसरात काही काळ तणावाचे पसरले होते.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्तानातून हाकलंलच पाहिजे हीच भूमिका असेल तर प्रथम वांद्रातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले आधी साफ करा अशा आशयाचे फलक मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी लावले आहेत.

 

मागे

राज्यातील सर्व खाजगी इमारतींना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक
राज्यातील सर्व खाजगी इमारतींना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक

राज्यातील सर्व खाजगी इमारतींना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक करण्याबाबत राज्....

अधिक वाचा

पुढे  

एसटी संदर्भात तक्रारी आहेत, परिवहन मंत्र्यांनी दिलेत हे आदेश
एसटी संदर्भात तक्रारी आहेत, परिवहन मंत्र्यांनी दिलेत हे आदेश

प्रत्येक एसटी बसमध्ये संबंधीत आगाराच्या प्रमुखांचे फोन नंबर झळकणार आहे. प्....

Read more