ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत अॅमेझॉनविरूद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अॅमेझॉन!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2020 10:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत अॅमेझॉनविरूद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अॅमेझॉन!

शहर : मुंबई

ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरु केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून (MNS) मुंबईभरात ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले आहेत. यावरनो मराठी, नो ॅमेझॉन असा मजकूर लिहण्यात आला आहे.

वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता ॅमेझॉनकडून यावर काय तोडगा काढण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी मनसेकडून ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठीसाठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

काही दिवसांपूर्वीच ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही यावेळी मनसेने दिली होती.

मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

ॅमेझॉनच्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. ॅमेझॉन ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा -मेल ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतरॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आले होते.

मागे

कांजूरमार्ग मेट्रोशेडचं काम तत्काळ थांबवा; हायकोर्टाचे निर्देश, राज्य सरकारला झटका
कांजूरमार्ग मेट्रोशेडचं काम तत्काळ थांबवा; हायकोर्टाचे निर्देश, राज्य सरकारला झटका

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला द....

अधिक वाचा

पुढे  

पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय
पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय

पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्ताव....

Read more