By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 14, 2021 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गटबाजीचं ग्रहण लागल्याची चर्चा आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या दौऱ्यात विदर्भातील प्रमुख नेत्यांनी दांडी मारल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर मनसेमध्ये नाराजीनाट्य पसरल्याचं बोललं जात आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर आजच्या दौऱ्यात उपस्थित नाहीत. गटबाजीमुळे विदर्भातील मनसेचे प्रमुख नेते नाराज आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.
राज ठाकरेंकडून पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश
राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसे पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात
राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे (MNS) पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
रिव्हर्स मोडवरचे इंजिन पुन्हा रुळावर येणार?
सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसेचे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळवलाय. परंतु विदर्भात गटबाजीचं वातावरण असल्याचं चित्र आहे. याचा फटका मनसेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई स....
अधिक वाचा