By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2020 01:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे सर्वच संतप्त झाले आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या 15 दिवसात वाढीव वीज बिल कमी केले नाही, तर मनसेच्या महिला पदाधिकारी मनसे स्टाईलने आमरण उपोषण करु, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला याबाबतचं निवेदन दिलं आहे. मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री सचिवालय, नवी मुंबईतील कोकण भवन यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. जर येत्या 15 दिवसात लाईट बिल कमी केले नाही. तर नवी मुंबई मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ या आमरण करु असा इशारा दिला आहे.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे लहान उद्योग धंदे बंद पडले आहेत. हातावर पोट भरणारे आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. त्यातच महावितरणाच्या वाढीव वीजेच्या बिलामुळे जनता चिंताग्रस्त झाली आहे. महावितरण कार्यालयात अनेक ग्राहक त्यांच्या वाढीव वीज बिलाबद्दल तक्रार घेऊन गेल्यावर तेथील आधिकारी यांची साधी दखल सुध्दा घेत नाहीत.
याप्रकरणी राज्य सरकारकडे मनसेने वारंवार निवेदन दिली. मनसेनं महावितरण कार्यालये फोडली तरी महाराष्ट्र सरकार वाढीव वीज बिलाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही, त्यामुळे जनतेला मोठा प्रश्न पडला आहे असं मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी सांगितले.
हाथरसमधील घटना आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभू....
अधिक वाचा