By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2024 07:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महिलांवर होणारे अत्याचार तसेच नोकरीनिमित्ताने रात्री उशीरा येणाऱ्या महिला अजूनही सुरक्षित नाही. याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महिला सुरक्षेसाठी विशेष मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांची सुरक्षा हा सध्या देशातील महत्त्वाचा मुद्दा आहे. देशात महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाच्या घटना रोजच समोर येत असतात. महिला कोणत्याही क्षेत्रात सुरक्षित नाहीत, हे वेळोवेळी समोर आले आहे. नोकरी- व्यवसायनिमित्त रात्री उशिरा कामावरुन घरी किंवा घरातून कामाच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्या अधिक आहे. परिणामी महिला अत्याचाराची एखादी घटना समोर आली की, त्यावर जातीचे राजकारण, कँडल मार्च आणि न्यायासाठी आंदोलने झाल्याचे पाहायला मिळालं आहे. पण यामुळे अत्याचार थांबतील का? याच घटना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सुरेक्षवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत मोबाइल अॅप तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या मोबाईल अॅपमुळे संकटात असलेली कोणतीही महिला ही पोलीस, पालिका किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधून मदत घेऊ शकते. मोबाइल ॲप पोलिस आणि महापालिका यंत्रणेशी जोडले जाणार आहे. महिलांना विविध गुन्हेगारी कृत्ये किंवा कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांशी संबंधित गुन्हे मोठ्या प्रमाणात नोंदवले जातात. चोरीसाठी महिलांना बळजबरीने मारहाण केल्याच्या घटना घडत आहेत. सुरक्षेसोबतच अत्यंत कठीण परिस्थितीत महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी मुंबई महापालिकेने मोबाइल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकाने दिली. मुंबई महिला सुरक्षा अभियानांतर्गत हे ॲप तयार करण्यात येत आहे. पोलीस, होमगार्ड, सामाजिक संस्था आदींचा समावेश असेल. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळेल.
महिलांना काही समस्या असल्यास त्या पालिका, पोलीस किंवा इतर यंत्रणांकडून तात्काळ किंवा आपत्कालीन मदत घेऊ शकतात. ॲप तयार केल्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. महिलेशी संपर्क साधल्यानंतर तिला तातडीने मदत मिळावी यासाठी पोलिसांच्या मदतीने गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. 2024-25 मध्ये फक्त महिला सुरक्षा सुविधा उपलब्ध असतील. या विशेष मोहिमेसाठी पालिकेने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
दररोज 100 किलोमीटर सायकल चालविणाऱ्या सायकल पटू अनिल कडसूर यांचा हृदयविकाराच....
अधिक वाचा