By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
फॅशन शोच्या दरम्यान अनेक मॉडेलसोबत कित्येकदा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. या मॉडेलच्या कपड्यांमुळे, त्यांच्या हाय हिल्समुळे अनेकदा काही हादसे झाल्याच्या अनेक बातम्या दाखवल्या जातात. परंतु ब्राझीलमध्ये रनवेवर वॉक करण्यासाठी जाताना एका मॉडेलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. साओ पाओलो फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी शनिवारी कॅटवॉकदरम्यान ब्राजीलमधील एका मॉडेलचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तेथील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रनवेसाठी जाताना 26 वर्षीय मॉडेल चक्कर येऊन पडला. डॉक्टरांना बोलावून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाची माहिती समोर आली आहे.
सांगाव मानपाडा रोड येथे औषध निर्माण कंपनीत एसीमध्ये बिघाड झाल्याने अचनाक स....
अधिक वाचा