By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 18, 2019 04:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
केंद्रातील मोदी सरकार लवकरच नागरिकांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतं. कारण, लवकरच शॉपिंग मॉल, सुपर मार्केट, कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये पेट्रोल आणि डिझेल विकत मिळालं तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेलच ना... होय, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला आहे आणि तो मंजूर करण्याची तयारीही सरकारनं दर्शवलीय. पेट्रोल आणि डिझेल सहज उपलब्ध व्हावं, म्हणून सरकार हे पाऊल उचलू शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्युएल रिटेलिंगसाठी सरकारकडून लवकरच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो. 'फ्युएल रिटेलिंग'चा अर्थ तुम्हाला पेट्रोल डिझेल केवळ पेट्रोल पंपावरच नाहीतर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येही विकत मिळू शकतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोलियम आणि नॅच्युरल गॅस मंत्रालय या प्रस्तावावर गंभीरतेनं विचार करत आहे. तसंच हा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवला जाऊ शकतो. खाजगी विक्रेत्यांना 'फ्युएल रिटेलिंग'कडे आकर्षित करण्यासाठी अनेक नियम आणि अटींमध्ये सूटही दिली जाऊ शकते. सध्या पेट्रोल-डिझेल विक्रीसंबंधी फार कडक नियमांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे, खासगी विक्रेत्यांनी 'फ्युएल रिटेलिंग'साठी फार उत्सुकता दाखवली नाही.
सध्या जे नियम अस्तित्वात आहेत त्यानुसार, पेट्रोल - डिझेल विक्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर कमीत कमी २००० करोड रुपये, तीन मिलीयन टन फ्युएलची बँक गॅरंटी अशा नियमांची अंमलबजावणी करावी लागते. या नियमांत थोडी शिथिलता आणली जाऊ शकते.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून, फडणवीस सरका....
अधिक वाचा