ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका कायम; मोदी सरकारचा मोठा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2020 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका कायम; मोदी सरकारचा मोठा निर्णय

शहर : देश

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा जगभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे मोदी सरकारने ब्रिटनवरील (United Kingdom) हवाई निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन आणि भारतातील हवाई सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता आता केंद्र सरकारने ब्रिटनवरील हवाई निर्बंधाचा कालवाधी 7 जानेवरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली.

गेल्याच आठवड्यात 21 डिसेंबरला केंद्र सरकारने ब्रिटनमध्ये येणारी आणि जाणारी हवाई सेवा खंडित केली होती. त्यानंतर ब्रिटनहून मुंबईत आलेल्या विमानांमधील प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले होते.  या सर्व प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

SARS-CoV-2 या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा शिरकाव भारतात झाला आहे. जवळपास 20 भारतीय नागरिकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, स्‍वीडन, स्वित्झर्लंड, स्‍पेन, कॅनाडा, जर्मनी, लेबनॉन, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये नव्या कोरनाचा शिरकाव झाला आहे.भारतात आढळलेल्या 20 रुग्णांपैकी तीन जण बंगळुरु दोन हैदराबाद आणि एक रुग्ण पुणे येथील आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका मुलीलासुद्धा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत ब्रिटनहून भारतात परतली होती.

पुण्यात 109 प्रवाशांची माहिती मिळेना

गेल्या 15 दिवसांत ब्रिटनमधून पुण्यात काही नागरिक आले आहेत. एकूण 109 नागरिकांचा येथील प्रशासन शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी काही नागरिकांच्या घराचा पत्ता प्रशासनाकडे आहे. तर काही प्रवाशी फोन उचलत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे अवघड होऊन बसले आहे. ब्रिटनहून काही प्रवासी मुंबईला उतरले. त्यांनतर ते पुण्याला आले. आम्ही या प्रवाशांना ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे पुणे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुढे  

सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले
सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले

कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. त्यानंतर अन....

Read more