ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल

शहर : पुणे

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून आज अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोहोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मान्सून येण्याचे संकेत मिळत आहेत.यंदा मान्सून सरासरी ९६ टक्के एवढाच बरसणार आहे. त्यातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होईल, असे हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. एल निनोचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचा फायदा मान्सून चांगला होण्यासाठी होईल. तसेच, इंडियन ओसीयन डिपॉल अर्थात आयओडी हा स्थानिक घटक देखील मान्सूनवर परिणाम करणार आहे.यंदा आयओडी सकारात्मक आहे. त्याचा परीणाम देखील मान्सून चांगला राहण्यासाठी होणार आहे. मान्सून अदमानमध्ये दाखल झाल्याने तो वेळत पोहोचण्याची शक्यता आहे. एल नीनोचा मान्सूनवर होणारा थोडाफार परिणाम भरुन निघेल. असा अंदाज पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डी. एस. पै यांनी व्यक्त केला आहे.

 

मागे

रामदास बोट अपघाताचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम यांचं निधन
रामदास बोट अपघाताचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम यांचं निधन

रामदास बोट अपघातात वाचलेले एकमेव व्यक्ती आणि घटनेचे साक्षीदार विश्वनाथ मु....

अधिक वाचा

पुढे  

शहीद भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येचा जवानांनी घेतला बदला
शहीद भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येचा जवानांनी घेतला बदला

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्य....

Read more