By
SHEETAL CHAVAN | प्रकाशित:
जून 08, 2019 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सर्वांना उत्सुकता असलेल्या मान्सूनचे अखेर भारतात आगमन. केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्याने पुढील आठवड्यात तो महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ७ ते १० जूनपर्यंत राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा एक आठवडाभर उशिराने होण्याची शक्यता आहे.१३ ते १५ जून दरम्याम मान्सून महाराष्ट्रात होईल, असे हवामान विभागातील साबळे यांनी सांगितले. १० जूननंतर कोकणात पाऊस पडेल. मात्र २० जूनपर्यंत अंतर्भागात आणि किनारपट्टीवरही पाऊस सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. २८ जूननंतर पावसाचा सर्वदूर संचार होईल त्यामुळे राज्यातील पावसासंदर्भात अधिक अचूक अंदाज मिळण्यासाठी आणखी आठवडाभराची वाट पहावी लागणार आहे.