ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात सात दिवस उशिरानं दाखल होणार मान्सून

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 04, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात सात दिवस उशिरानं दाखल होणार मान्सून

शहर : पुणे

नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात येणारा मान्सून आता श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यालगतच्या परिसरात दाखल झालाय. मान्सूनची ही वाटचाल जवळपास सात दिवस म्हणजे आठवडाभर मागे आहे. सामान्य स्थितीत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर २५ ते २८ मे दरम्यान मान्सूनचा पाऊस धडकण्याची अपेक्षा असते. यंदा मात्र प्रत्यक्षात साधारण सात दिवस उशिरा म्हणजे जूनला दक्षिण श्रीलंकेत मौसमी पावसानं बरसायला सुरूवात केलीय. अर्थातच भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरही पाऊस किमान सात दिवस उशिरानेच येणार हे आता निश्चित झालंय. हवामान पोषक राहिल्यास पुढील आठवड्यात किंवा त्यानंतरच मौसमी पाऊस केरळ किनाऱ्यावर पडायला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. पुणे वेधशाळेनं दिलेल्या भारतीय उपखंडातील मौसमी पावसाच्या वाटचालीच्या मानचित्रातून तरी सध्या असंच चित्रं दिसतंय.

तर दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत होरपळणारे चंद्रपूरकर सोमवरी पावसात न्हाऊन निघाले. दुपारभर शहरवासीयांनी उन्हाचा तडाखा अनुभवला. संध्याकाळच्या सुमारास  सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि अचानक  वातावरण बदलले. काळ्या ढगांची आकाशात दाटी झाली आणि चार महिने प्रतीक्षा असलेल्या टपोऱ्या थेंबानी फेर धरला. वातावरणात सुखद बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. साधारण अर्धा तास वरुणराजाने हलक्या सरींची बरसात केली. मान्सूनपूर्व पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने उत्तम सरी बरसण्याची आशा पल्लवित झाली आहे. या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले आहे. आकाश अजूनही काळ्या मेघांनी भरून असल्याने पाऊस आणखी बरसेल असा अंदाज आहे.

मागे

राम मंदिरासाठी साधु-संतांची बैठक पुन्हा एकदा आवाज उठवण्याचा निर्णय
राम मंदिरासाठी साधु-संतांची बैठक पुन्हा एकदा आवाज उठवण्याचा निर्णय

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राम मंदिर निर्म....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई-दिल्ली मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार
मुंबई-दिल्ली मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड 'वंदे भारत एक्सप्रेस' सध्या दिल्ली त....

Read more