By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
इस्रोची महत्वाकांक्षी मोहीम म्हणून गाजत असलेल्या चंद्रयान 2 ने दोन दिवसांपूर्वी चंद्राच्या कशेत प्रवेश केल्यानंतर सुमारे 2650 किमी. उंचीवरून चंद्राचे पहिले छायाचित्र LI4 कॅमेराने टिपून पाठविले. हे छायाचित्र इस्रोने आपल्या वेबसाइट व सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले आहे.
Take a look at the first Moon image captured by #Chandrayaan2 #VikramLander taken at a height of about 2650 km from Lunar surface on August 21, 2019.
— ISRO (@isro) August 22, 2019
Mare Orientale basin and Apollo craters are identified in the picture.#ISRO pic.twitter.com/ZEoLnSlATQ
गेल्या महिन्यात 22 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चंद्रयान 2 चंद्राच्या दिशेने झेपावले. 14 ऑगस्टला यानाला चंद्राच्या कक्षेकडे मार्गस्थ करण्यात शास्त्रज्ञाना यश आले. 20 ऑगस्टला यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर चंद्रयान 2 ने चंद्राचे पहिले छायाचित्र ही टिपले. चंद्रयान 2 अंडाकृती कक्षेत 24 तास प्रदक्षिणा घालणार आहे. दरम्यान यानाचा वेग 10.98 किमी. प्रतीसेकदावरून 1.98 किमी. प्रतीसेकंद करण्यात आला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे यान अनियंत्रित होऊन धडकू नये, यासाठी चंद्रयानाचा वेग कमी करण्यात आला आहे. येत्या 7 सप्टेंबरला चंद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे.
दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर , नेताजी सुभाष चंद्र बोस, भगतसिंग....
अधिक वाचा