By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2020 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : panaji
देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 90 हजारांच्या वर गेली आहे. काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईहून गोव्याला ट्रेनने परत आलेल्या एकूण 7 जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे. रविवारी मुंबईहून गोव्याला ट्रेनने आलेल्या सुमारे 100 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी चार जण पहिल्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. आता सोमवारी सकाळी आणखी तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, या सर्वांची टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. उर्वरित लोकांचा रिपोर्ट अजून येणे बाकी आहे.
भारतीय रेल्वेकड़ून विशेष गाड्या चालवल्या जात आहे. त्यामुळे लोकं एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचत आहेत. यामध्ये अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यांपुढील आव्हान आता आणखी वाढणार आहे. एकजरी रुग्ण शहरात घुसला तर त्याचे परिणाम प्रशासनाला माहित आहेत.
सध्या राजधानी दिल्लीतून पंधरा शहरांमध्ये रेल्वे धावत आहेत. काही मुख्य ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेलं गोवा राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने धडक दिली आहे. गोवा सरकारने राज्याला कोरोना मुक्त घोषित केले होते, पण आता पुन्हा एकदा येथे रुग्ण वाढू लागले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे.
देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील लॉक....
अधिक वाचा