By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2020 09:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढतेय.एकट्या मुंबईत ११६ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील वरळीत आणखी ४०हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. जीजामाता नगर, वरळी कोळी वाड्यातील ३८१ लोक वेळीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडला काही अंशी तरी आळा घालता आला. वरळीत क्वारंटाईन केलेल्या ३८१ पैकी ४० पेक्षा जास्त लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना वेळीच क्वारंटाईन केलं नसतं तर धोका वाढला असता. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे क्वारंटाईन केलेल्याच व्यक्तींमध्ये कोरोना पॉजिटिव्ह आढळत असल्याने जास्त धोका नाही.याआधीच जीजामाता नगरमध्ये २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आणखी १३ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. वरळीतील हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्ण पोद्दार रुग्णालयामध्ये आणि पवईच्या एमसीएमआर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहेत.एलफिन्स्टनजवळ वीरा बिल्डींगमध्ये १७ लोक पॉझिटिव्ह आले होते. मात्र आता एकही केस वाढलेली नाही. जी दक्षिण वॉर्डमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता ११५वर पोहोचला आहे.
राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात ....
अधिक वाचा