By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2019 05:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - सांताक्रूझ (पूर्व) येथे सहयोग महाजीवन प्रगती मंडळ या जुन्या चाळीतील रहिवाशी माला भुमन्ना नागम (वय ४५) व तिचा मुलगा संतोष नागम (वय २६) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तथापि तूफान पाऊस पडत असताना आणि पाणी वेगाने भरत असताना या भागातील अदानी कंपनीने वीज पुरवठा खंडित केला नाही. परिणामी पाणी मीटर बॉक्समध्ये गेले आणि या माता-पुत्राला प्राण गमवावा लागला, असा आरोप करीत स्थानिक रहिवाश्यांनी अदानी वीज कंपनीच्या निषेधार्थ पश्चिम द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, या सहयोग महाजीवन सोसायटीत विजेचा मीटर बॉक्स पूर्वी उंचीवर होता, परंतु तेथे गेले काही वर्ष सातत्याने भराव केला गेल्याने त्याची ऊंची कमी झाली. साहजिकच शनिवारच्या मुसळधार पावसाने या भागातही पाणी साचले व ते मीटर बॉक्समध्येही गेले. वीजेचा प्रवाह पाण्यातही प्रवाहीत होता. त्याचाच फटका या माता-पुत्राला बसला. मात्र ही घटना अदानी वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा दावा स्थानिक रहिवाशी करीत आहेत.
मुंबईतील २३ अतीधोकादायक इमारती तातडीने जमीनदोस्त करून त्याचे पुरावे सादर ....
अधिक वाचा