ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्यप्रदेशमध्ये दोन बहिणींना झाडाला बांधून जमावाने केली मारहाण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्यप्रदेशमध्ये दोन बहिणींना झाडाला बांधून जमावाने केली मारहाण

शहर : ashok Nagar

एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून अमानूष मारहाण करण्यात आली. त्या दोन मुलींमध्ये एक अल्पवयीन आहे. एका विवाहित महिलेला पळवून नेल्याचा आरोप करत त्या तरुणाला मारहाण करण्यात आली. तर त्यांना पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून त्याच्या दोन चुलत बहीणींनाही झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा विनयभंगही करण्यात आला. या तिघांना मारहाण करणार्‍यांमध्ये त्या विवाहित महिलेच्या पतीचाही समावेश होता. या तिघांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी गावकर्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या तिघांना मारहाण होत असताना जमलेले लोक हसताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. झाडाला बांधलेल्या एका मुलीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता एक व्यक्ती तिचा हात पकडतो आणि दोनजण तिला मारहाण करतात, असेही व्हिडिओत दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाचजणांना अटक केली आहे. त्यात तीन महिलांचाही समावेश आहे. इतर चारजण फरार आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

मागे

 “कांचनजुंगा” शिखरावर “गिरिप्रेमी” च्या १० गिर्यारोहकांची यशस्वी चढाई
“कांचनजुंगा” शिखरावर “गिरिप्रेमी” च्या १० गिर्यारोहकांची यशस्वी चढाई

जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शिखर कांचनजुंगा शिखर सर करण्याचा मान पुण्याच....

अधिक वाचा

पुढे  

अंबरनाथमध्ये आयफोनचा स्फोट; तरुण गंभीर जखमी
अंबरनाथमध्ये आयफोनचा स्फोट; तरुण गंभीर जखमी

अंबरनाथमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन 6 या मोबाइलचा भीषण स्फोट झाल्याची घटना ....

Read more