By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 07:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात केली असली तरी उद्योगधंद्यात आलेली मंदी हटण्यास अवधी लागणार आहे. या मंदीच्या पार्श्वभूमीवर लघु आणि मध्यम उद्योगानी खर्च कपात करून रोजगार टिकवण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. शिवाय कंत्राटी पद्धतीने देण्यात येणारी कामेही तूर्तास थबविली आहेत. अनेक उद्योगानी सुट्या भागांचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे कामगारांना देण्यासाठीचे आठ तासांचे काम उपलब्ध नाही. परिणामी अशा लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कामगारांना 2 किंवा 3 टप्प्यामध्ये 15 दिवसांची रजा घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
लघु अन मध्यम उद्योगांना मंदीमुळे घेतलेल्या खर्च कपातीच्या निर्णयामुळे हजारो कामगार हवालदिल झाले आहेत. मात्र लवकरच मंदी दूर होईल, अशी आशा कामगारांना व्यक्त करीत आहेत.
मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट विक्री केंद्रावर मध्यरात....
अधिक वाचा