By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एमटीएनएलच्या कर्मचार्यांचे जून महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. आर्थिक चणचणीत असलेल्या एमटीएनएलच्या व्यवस्थापनाकडे कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नसल्याचे उघडकीस आले. गेल्या ऑक्टोंबर पासून या कर्मचार्याच्या वेतनाची समस्या उभी राहिली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने 1 हजार कोटी रुपये देण्याची तयारी दर्शिवली असली तरी अद्याप ही रक्कम न मिळाल्याने या कर्माचार्याँचे जून महिन्याचे वेतन जमा होऊ शकलेले नाही. वेळोवेळी दूरसंचार विभागाने दिलेल्या निधीमुळे प्रत्येक महिण्याच्या 10 ते 20 तारखेला कर्मचार्यांना वेतन मिळाले आहे. पण यावेळी जुलै महिना संपत आला तरी जून चा पगार मिळालेला नाही.
मुंबईत ठिकठिकाणी मेट्रो रेल्वे मार्गाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्....
अधिक वाचा