By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 01:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
इस्त्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून इस्त्रो 2020 मध्ये गगनयान आणि चांद्रयान-3 मोहीम लॉन्च करणार आहे. तसेच या मोहिमेसाठी सरकारने देखील मान्यता दिली असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
के सिवन म्हणाले, गगनयानच्या अंतराळवीरांना जानेवारीच्या महिन्याच्या तिसर्या महिन्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसंच गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेवर आम्ही चांगली प्रगती केली होती. लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला असला तरी चांद्रयान-2 मोहिमेवेळी पाठवलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच पुढील सात वर्षांपर्यंत ऑर्बिटर कार्यरत राहणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.
नौशेरा - संपूर्ण देशात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू असताना ....
अधिक वाचा