By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 10:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत छोटं का होईना पण घर असावं, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. या योजनेनुसार, मुंबईतील गोरेगावात अवघ्या 30 लाखात घर घेता येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत ही गृहनिर्माण योजना तयार करण्यात आली आहे (Home Scheme In Goregaon).
मुंबईत सध्या साध्या घरांची किंमती कोटींच्या वर पोहोचली आहे. मात्र, गोरेगाव सारख्या परिसरात मुंबईकरांना अवघ्या 30 लाखामध्ये घर खरेदी करता येणार आहे. शहरात पहिल्यांदाच अशाप्रकारची गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तयार करण्यात आली आहे.
टाईम्सच्या वृत्तानुसार, या गृहनिर्माण योजनचं भूमीपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतं, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकार या योजनेला मान्यता देईल, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं.ही जागा खासगी मालकीची आहे. तो इको सेन्सेटिव्ह झोन आहे. पण, मागील बैठकीत सर्व माहिती उपलब्ध नसल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आला होता, असं नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सांगितलं.
मुंबईतील हा गृहनिर्माण प्रकल्प सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा नागरिकांसाठी असणार असल्याची माहिती मिलिंद म्हैसकर यांनी दिली. यामध्ये 300 चौ. किमी घराची जागा असणार आहे. ज्यामध्ये विकासकाला त्याला विकसकास फ्लोर स्पेस इंडेक्सला 2.5 मध्ये परवाणगी दिली जाईल. तर यामध्ये 50% हिस्सा हा 1500 ईडब्ल्यूएस युनिटमध्ये प्रकल्पाला असेल तर उर्वरित रक्कम खुल्या बाजारात विक्रीसाठी असणार आहे
दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला आणणारा एसएससी बोर्डाचा निका....
अधिक वाचा