By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2020 01:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतील रुग्णालय परिसर हा ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या खासगी रुग्णालयातील एका नर्सचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला) आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर नर्सलाही कोरोनाची लक्षण दिसू लागली आणि या नर्सचा स्वॅब टेस्टचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.
विशेष म्हणजे वरळीतील बीडीडी चाळीत राहणारा एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली. हा व्यक्ती याच खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचे काम करत होता.
दरम्यान काल (6 एप्रिल) आणखी एका रुग्णालयातील 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानतंर हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता.
त्यामुळे या रुग्णालयातून आतून बाहेर जाण्यास तसेच बाहेरुन रुग्णालयात जाण्यास मनाई करण्यात येत आहे. जोपर्यंत या रुग्णालयातील सर्व रुग्णांचा रिपोर्ट हा जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे.
या रुग्णालयातील 270 नर्से आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. ज्या नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाचा गुणाकार होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात 868 जणांना कोरोना....
अधिक वाचा