By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 15, 2019 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईची रहिवासी असलेल्या २३ वर्षीय आरोही पंडित या तरुणीनं एक नवा इतिहास रचलाय. आरोही लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट (एलएसए) च्या साहाय्यानं अटलांटिक महासागर ओलांडणारी जगातील पहिली महिली बनलीय. सोमवार-मंगळवारी आरोहीनं आपल्या छोट्या विमानासोबत एकटीनंच स्कॉटलंडच्या 'विक' पासून उड्डाण घेतलं. जवळपास ३००० किमीचा प्रवास करत तिनं कॅनडाच्या इकालुइट एअरपोर्टवर लॅन्डिंग केलं.
या दरम्यान आरोहीनं आइसलँड आणि ग्रीनलँडला थांबा घेतला. आरोहीनं हे उड्डाण 'वी! वूमन एम्पावर एक्सपीडिशन' अंतर्गत घेतलं. आरोहीच्या विमानाचं नाव 'माही' असं होतं. रनवे वर उतरल्यानंतर तिनं विमानातून खाली उतरत भारताचा तिरंगा फडकावला.
नवा इतिहास आपल्या नावावर जमा झाल्यानं आरोही अत्यंत आनंदी आहे. तिच्या या धाडसानं तिचे कुटुंबीय आणि एव्हिएशन सर्कलशी संबंधितही खुश आहेत. 'सोशल एसेस' या संस्थेकडून हा प्रवास आयोजित करण्यात आला होता.
आरोही एलएसए लायसन्सधारक आहे. तिचं 'माही' हे छोटं विमान एक सिंगल इंजिन साइनस ९१२ जहाज आहे. याचं वजन एका बुलेट बाईकहूनही कमी म्हणजेच जवळपास ४०० किलोग्रॅम आहे. या मोहिमेसाठी आरोहीनं गेले सात महिने 'बॉम्बे फ्लाईंग क्लब'मधून ट्रेनिंग घेतलं होतं. खराब वातावरणातही उड्डाण घेत तिनं आपलं ट्रेनिंग पूर्ण केलं होतं.
केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान नसते तर मी कोलकत्यामधून सहीसल....
अधिक वाचा