By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2020 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण खाटांपैकी जवळपास 50 टक्के खाटा रिकाम्या आहेत, अशी माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर 40 % ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबईत फक्त 210 आयसीयु बेड
मात्र, मुंबईत सध्या केवळ 210 आयसीयु खाटा रिक्त आहेत. तर, 126 व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यास आगामी काळात आयसीयु आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये सीसीसी 1 प्रकारातील एकूण 17698 खाटांपैकी केवळ 2332 खाटांवर रुग्ण आहेत. तर सीसीसी 2 प्रकारातील 2918 खाटांपैकी 1769 खाटांवर रुग्ण आहेत.
जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये गरज पडल्यास अतिरीक्त 44 हजार खाटा तात्काळ कार्यान्वित केले जाऊ शकतील अशी सुविधा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कोव्हिड रुग्णालयांमधील एकूण 17,724 खाटांपैकी 5931 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 8805 खाटांपैकी 2920 खाटा रिक्त आहेत. तर आयसीयु 1786 खाटांपैकी 210 बेड रिक्त आहेत. तर व्हेंटिलेटर 1119 खाटांपैकी 126 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुर....
अधिक वाचा