By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 09:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभरही झोडपले. कुलाब्यामध्ये आत्तापर्यंतच्या ऑगस्ट महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद आज झाली आहे. आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढलाय.
मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या 46 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं. कोलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल 46 वर्षांनंतर 12 तासांमध्ये 294 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
दरम्यान उद्यादेखील पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.
पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून, कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.
पावसाचा वाढता जोर पाहता कोल्हापुरात प्रशासन सतर्क झालं आहे. पंचगंगा नदीच्य....
अधिक वाचा