By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 06, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत आज (रविवार 5 एप्रिल) 81 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 450 पार गेला आहे. तर महाराष्ट्रात आज 113 नवे रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 748 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या जागा ‘कोरोना’चे हॉटस्पॉट ठरल्या आहेत.
मुंबईतले कोरोनाचे हॉटस्पॉट कोणते ?
जागा – कोरोना रुग्ण
वरळी, करी रोड, परेल – 58
गिरगाव, नाना चौक, बाबूलनाथ – 31
अंधेरी पश्चिम – 25
अंधेरी पूर्व, मरोळ – 24
भायखळा, माझगाव – 19
दहिसर – 18
सांताक्रूझ, विलेपार्ले – 18
चेंबूर नाका, घाटला स्टेशन – 17
मानखुर्द, शिवाजी नगर – 17
घाटकोपर – 14
कांदिवली, चारकोप – 11
भांडूप – 11
मुलुंड – 10
चंदनवाडी – 7
गोरेगाव, आरे, मोतीलाल नगर – 7
वांद्रे, सांताक्रूझ – 7
फोर्ट, कुलाबा – 7
कुर्ला – 6
सायन कोळीवाडा, रावली कॅम्प, प्रतीक्षा नगर – 5
बोरिवली पश्चिम – 4
दादर पश्चिम, माहीम, धारावी – 4
परेल, शिवडी, काळाचौकी – 4
डोंगरी, पायधुनी – 2
मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा ‘कोरोना’मुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वरळी कोळीवाडा, धारावीनंतर पवई झोपडपट्टीतही ‘कोरोना’ने शिरकाव केला. वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
मुंबईतील अंधेरीत एकाच कुटुंबातील 10 जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. गेल....
अधिक वाचा