ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत 'कोरोना' रुग्ण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2020 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत 'कोरोना' रुग्ण

शहर : मुंबई

मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वरळी कोळीवाडा आणि धारावीनंतर आता पवई झोपडपट्टीतही ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्यानंतर पवई झोपडपट्टीतील संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे.

पवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संपूर्ण झोपडपट्टीच सील करण्यात आली आहे. इथे संचार करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. पंचशीलनगरमध्ये क्वारंटाईन झोन करण्यात आला आहे.

मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा काल ‘कोरोना’मुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

वरळी आणि धारावी- ‘कोरोना’चा फटका

वरळीतील कोळीवाड्याच्या नेत्याचं ‘कोरोना’वरील उपचारादरम्यान निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगाही ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. या वृत्तामुळे वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.

वरळी कोळीवाडा परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण मिळाला. 35 वर्षीय डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णापासून डॉक्टरला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.

डॉक्टरच्या कुटुंबालाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तो राहत असलेली इमारतही मुंबई महापालिकेने सील केली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध सुरु आहे.

वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात काल दिवसभरात 88 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 54 रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 235 झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 24 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहेत. मुंबईत काल दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

मागे

तेव्हा लोकांनी ढोल वाजवले, आता आग लावली नाही म्हणजे झालं : संजय राऊत
तेव्हा लोकांनी ढोल वाजवले, आता आग लावली नाही म्हणजे झालं : संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे ल....

अधिक वाचा

पुढे  

Corona : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 142 जण क्वारंटाईन
Corona : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 142 जण क्वारंटाईन

मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या CISF च्या 11 जवानांना कोरोनाची  लागण झाल्य....

Read more