ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना : मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना : मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद

शहर : मुंबई

कोरोनाची लागण देशभरात पसरत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ही १६८ वर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात ४९ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आतापर्यंत एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत खबरदारी घेतली जात आहे. मुंबईचा सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या दिनांक २० मार्च २०२० पासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट व मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाद्वारे घेण्यात आला आहे. त्याच प्रमाणे  १ एप्रिल २०२० पासून सेवा नियमितपणे सुरू राहील. सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच स्वतःची काळजी घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे.

मुंबईत सदृश्य लॉक डाऊन करण्यात आलं आहे. शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्विकारण्यास सांगितलं आहे. तसेच एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवस आड करून कामावर यावे आणि ५० टक्के कर्मचारी फक्त कार्यालयात उपस्थित राहावेत असे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर डबेवाल्यांनी सेवा काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागे

घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार....

अधिक वाचा

पुढे  

गर्दी टाळण्यासाठी दादरची दुकानं 100% लॉकडाऊन, व्यापारी संघटनेचा स्तुत्य निर्णय
गर्दी टाळण्यासाठी दादरची दुकानं 100% लॉकडाऊन, व्यापारी संघटनेचा स्तुत्य निर्णय

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच रोखण्यासाठी प्रशासन स....

Read more