By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 02:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील टोलेजंग इमारती , दाटीवाटीच्या झोपडपट्टया आदि ठिकांनामध्ये लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना जीवघेणी कसरत करावी लागते. प्रचंड धूरात गुदमरून जीव जाण्याचा धोका असतो. आता या धोक्यावर मात करून कोठेही आगीवर नियंत्रण मिळविण्यास सक्षम असणारा अत्याधुनिक रोबो मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
फ्रांसच्या कंपनीने तयार केलेल्या या रोबो ची किमत 1 कोटी रुपये आहे. हा रोबो 55 मिटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो 300 मिटर पर्यंत त्याचे रिमोट द्वारे नियंत्रण करता येईल. 700 अंश सेल्शिअसच्या तापमानात ही हा रोबो काम करू शकेल. आगीत थेट उडी मारून तो आगीवर नियंत्रण मिळवेल. हा रोबो बॅटरी वर चालणार असून पाण्याचे पाईप ओढणे, आग विझवणे अशी कामे करील , यात कॅमेरा बसविण्यात आल्याने घटना स्थळाचा अंदाज ही घेता येणार आहे.
उंडील तिठयावर बुधवारी 17 जुलैला दुपारी 3.30 च्या सुमारास सहदेव नर यांच्या घराज....
अधिक वाचा