By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 01:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
खेड, चिपळूण, संगमेश्वर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलाडली आहे. शिवाय येत्या 24 तासात अति वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 9.30 वाजल्यापासुन मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. कारण खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
दुसरी खेड दापोली रोडवर नारंगीचे पानी आतल्याने दापोलीची वाहतुकही बंद आहे. पालगड पुलावर पानी आल्याने दापोली,राजापूर, मंडंनगड वाहतूक ठप्प आहे. चिपळूण बाजारपेठेत पुलाचे पानी आले आहे. चिंचघर येथे रस्त्यावर पानी आल्याने सती अडरे - अणारी रस्ता बंद आहे. चिपळूण गुहागर बाय पास मार्गावरही पाणी साचले आहे. वाशिष्टी पूलावरील वाहतूक अवघड वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारताच्या चंद्रयान -2 च्या महत्वाकांक्षी योजनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लाग....
अधिक वाचा