By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. हा उन्हाचा कहर आणखी दोन दिवस असाच बरसणार असून मुंबईचे तापमान एक डिग्री सेल्सियसने वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अकोल्यात रविवारी 47 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. या ठिकाणीही पारा आणखी चढणार असून अकोला यापूर्वीचा स्वतःचा रेकॉर्ड मोडेल असाही अंदाज आहे. दरम्यान, मुंबईसह 17 मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मतदारांना आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. परभणी, लातूर, नांदेड, नंदुरबार या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यावर अक्षरशः संचारबंदी लागू झाल्यासारखी परिस्थिती आहे. उष्माघाताचा त्रास जाणवू नये म्हणून काळजी घ्या. महिलांनी घराबाहेर पडताना चेहऱयाभोवती स्कार्फ गुंडाळावा, तर पुरुषांनीही काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शहर तापमान |
|
अकोला 47.2 | 47.2 |
संभाजीनगर | 44 |
बुलढाणा | 44 |
बीड | 45 |
जळगाव | 45 |
अमरावती | 46 |
चंद्रपूर | 47 |
नागपूर | 45 |
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. रोहिदास ....
अधिक वाचा