By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 24, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगराला झोडपून काढले, त्यामुळे दादर शिवडी परळ सायन चेंबूर गोवंडी मानखुर्द मध्येही पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी रात्रभर काम करताना दिसून आले सायनमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आले. मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावर 15 ते 20 मिनिटे तर मध्य रेल्वेमार्गावर दहा ते पंधरा मिनिटे गाड्या उशिराने धावत आहेत, त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
ठीक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक खासगी वाहने बंद पडली सायन ते सीएसटी दरम्यान ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं रात्रभर वसई-विरार लाही पावसाने झोडपले. मुंबईत कुलाब्यामध्ये गेल्या बारा तासात 171 मी तर सांताक्रुझमध्ये 58 मिमी पावसाची नोंद झाली. कुलाब्यात दोन तासात 52 मिमी पाऊस कोसळला, दरम्यान येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.
रत्नागिरीला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अतिवृष्टीचा गणपतीपुळे दे....
अधिक वाचा