ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मानसिक तणावाखाली इमारतीवरून उडी घेतलेल्या महिलेचा मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मानसिक तणावाखाली इमारतीवरून उडी घेतलेल्या महिलेचा मृत्यू

शहर : मुंबई

     मुंबई -  कांदिवली परिसरातील चारकोपमधील रॉक एव्हेन्यू इमारतीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. डिंपल वाडिलाल असं या महिलेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच वाडिलाल यांना कामावरून काढण्यात आलं होतं. त्यामुळे त्या मानसिक तणावाखाली वावरत होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 


       ज्यावेळी त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळी स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. डिंपल वाडिलाल या आपल्या आईसह कांदिवलीतील चारकोपनजीक असलेल्या एका इमारतीत राहत होत्या. ३१ डिसेंबर रोजी त्यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं.


      त्यानंतर त्या मानसिक तणावाखाली वावरत होत्या. तसंच त्यांनी आपल्या मित्र परिवार आणि निकटवर्तीयांशी बोलणंदेखील सोडलं होतं. अखेर गुरूवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या इंमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी घेतली आणि आपला जीवनप्रवास संपवला.

 

        ज्यावेळी त्या उडी मारण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळी स्थानिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. खाली असलेल्या एका व्यक्तीनं त्यांना धरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्या व्यक्तीच्या खांद्याला दुखापत झाली असल्याची माहिती चारकोप पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस विठ्ठल शिंदे यांनी दिली. 


        दरम्यान, स्थानिकांनी वाडिलाल यांना त्वरित कांदिवलीतील शताब्दी रूग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सध्या आम्ही अधिक तपास करत आहोत. त्यांनी आपल्या घरात सुसाईड नोट ठेवली आहे का हे पाहणार आहोत, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.
 

मागे

 इस्रोच्या इंजिनीअरचा दुर्दैवी मृत्यू
इस्रोच्या इंजिनीअरचा दुर्दैवी मृत्यू

केरळ             इस्रोमध्ये काम करणार्या एका इंजिनीअरचा अपघाती मृत्य....

अधिक वाचा

पुढे  

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार
अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार

         कुर्द कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं इराकमधील बग....

Read more