By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 04:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दुरुस्तीचे काम सुरू असताना तोल गेल्याने लिफ्टवरून खाली पडून मॅकेनिकचा मृत्यू झाल्याची घटना चुनाभट्टी येथे घडली. केतन भैरात (42) असे त्या मॅकेनिकचे नाव असून तो ठाण्याचा रहिवासी होता. चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल टॉवरमध्ये सोमवारी लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. केतन हा लिफ्टच्या वरच्या बाजूला काम करत होता. त्यावेळी तोल गेल्याने केतन खाली पडला आणि खाली असलेला लोखंडी रॉड त्याच्या शरीरात घुसला. गंभीर जखमी झालेल्या केतनला अन्य कर्मचा़र्याने लगेच रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर आरोप करणारे केंद्रीय म....
अधिक वाचा