ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत राम नावाचा गजर, भजनांमध्ये रंगले प्रवाशी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 22, 2024 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत राम नावाचा गजर, भजनांमध्ये रंगले प्रवाशी

शहर : मुंबई

देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचवेळी देशभरात उत्साह सुरु आहे. लोकलपासून विमानापर्यंत प्रवाशी भाविक झाले आहे. रामनावाची भजने म्हटली जात आहे. विमान आणि लोकलमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

देशभरात आज भक्तीमय वातावरण झाले आहे. केंद्र शासनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज अर्धा दिवस सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्यात सुटी जाहीर करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी शहरे, रस्ते सजवण्यात आली आहेत. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन सुरु आहेत. मग आपल्या कामानिमित्त जाणाऱ्या भाविकांमध्ये हा उत्साह कायम आहे. मुंबईकर चाकरमाने लोकलमध्ये भजन कीर्तन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचवेळी दिल्लीतील अयोध्या जाणाऱ्या विमानात भाविक श्रीराम भजन म्हणताना प्रवाशी दिसत आहे. विमानातही भजन म्हटली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

IndiGo फ्लाइटमध्ये भजन

दिल्ली ते अयोध्या जाणाऱ्या विमानात भाविका आणि प्रवाशी श्रीरामची भजने म्हणत आहे. इंडिगोच्या विमानात राम भजनवार भाविक ठेके धरत आहेत. व्हिडिओत विमानात राम सिया राम धून गाताना लोक दिसत आहे. व्हिडिओत भगवे वस्त्र परिधान करणारा एक भाविक राम भजन म्हणत आहे. त्याला विमानात बसलेले इतर लोक प्रतिसाद देत आहे. विमानातील काही जण या क्षणाचा व्हिडिओ बनवत आहे.

मुंबई लोकलमध्ये राम धून

मुंबईत सरकारी कार्यालयांना सुटी आहे. परंतु मुंबई नेहमीप्रमाणे धावत आहेत. चाकरमाने आपल्या कामांवर जात आहे. यावेळी लोकलमध्ये राम भजने म्हणताना मुंबईतील चाकरमाने दिसत आहेत. विरारवरुन चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भगवान श्री रामाचे पोस्टर लावून मुंबईकर भजने गाताना दिसत आहे.

मुंबईत प्रभू श्रीरामाची २० फूट उंचीची मूर्ती

मुंबईतील जुहू बीचवर महाराष्ट्र नवनिर्माण सेवेतर्फे प्रभू श्रीरामाची २० फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा साजरा करत आहेत. आज कारसेवकांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

मागे

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावतानाच कोसळले, दोन स्पर्धकांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई मॅरेथॉनमध्ये धावतानाच कोसळले, दोन स्पर्धकांचा दुर्दैवी मृत्यू

या मॅरेथॉन स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या स्पर्धेत ....

अधिक वाचा

पुढे  

जाहले श्रीराम विराजमान… मंत्रोच्चार, शंख नादात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
जाहले श्रीराम विराजमान… मंत्रोच्चार, शंख नादात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी... शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्र....

Read more