ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकल पाण्यात अडकल्या, NDRF कडून प्रवाशांची थरारक सुटका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 09:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकल पाण्यात अडकल्या, NDRF कडून प्रवाशांची थरारक सुटका

शहर : मुंबई

मुंबईतील मस्जिद बंदर स्थानकाजवळ अडकलेल्या दोन लोकलमधून प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. रेस्क्यू बोटच्या सहाय्याने लोकलमध्ये अडकलेल्या 290 प्रवाशांना काल (बुधवार 5 ऑगस्ट) रात्री बाहेर काढण्यात आले. तुफान पावसामुळे रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यात लोकल अडकल्या होत्या.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसाचा फटका मुंबई लोकललाही बसला. मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर स्टेशनपासून काही अंतरावर दोन लोकल अडकल्या होत्या. रुळांवर चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे लोकल जागीच थांबल्या होत्या.

मस्जिद बंदर आणि भायखळ्यादरम्यान दोन रेल्वे लोकल अडकून पडल्या. लोकलमध्ये असलेल्या शेकडो प्रवाशांचे प्राण वरखाली होत होते. अखेर अडकून पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीममधील 45 जण तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सीएसएमटीहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील 251, तर टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील 39 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. सुटका केलेल्या प्रवाशांची तात्पुरती राहण्याची सोय मुंबई महापालिकेने जवळच्या शाळांमध्ये केली होती.

मुंबई-ठाणे रेड अलर्ट

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीसह उत्तर कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, सावधानता बाळगाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेत पालकमंत्र्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात असून संपूर्ण राज्यात 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईत अनेक वृक्ष उन्मळले

मुंबईत कालच्या दिवसात घरं पडण्याच्या सहा तक्रारी आल्या, तर झाडं आणि फांदी पडल्याच्या 141 घटना घडल्या. तुफान पावसाने मुंबईची अक्षरशः पुरेवाट झाली. गेल्या दोन दिवसापासून सलग पाऊस कोसळत आहे.

मागे

गुजरात राज्यात कोविड-१९ सेंटर रुग्णालयाला आग, आठ रुग्णांचा मृत्यू
गुजरात राज्यात कोविड-१९ सेंटर रुग्णालयाला आग, आठ रुग्णांचा मृत्यू

गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरला आग लागल्याने आठ रुग्ण....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात, प्रत्येकाला सज्ज राहण्याची सूचना : विजय वडेट्टीवार
राज्यात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात, प्रत्येकाला सज्ज राहण्याची सूचना : विजय वडेट्टीवार

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम ....

Read more