By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 06:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कामाच्या वेळेत मुंबई उपनगरी रेल्वे मार्गात प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीच्या वेळेत लोकलचे भाडे वाढविण्याचा पर्याय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने रेल्वे बोर्डाला सुचविला आहे. टॅक्सी सेवा आणि विमानसेवेच्या धर्तीवर उपनगरीय रेल्वे भाडे दरात बदल झाल्यास त्याचा भार प्रवाशांना सोसावा लागणार आहे. असे झाले तर रेल्वेला होणारा तोटा काही प्रमाणात भरून निघेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला उपनगरीय लोकल मधून दररोज 80 लाख लोक प्रवास करतात. त्यातील 20 ते 22 लाख प्रवासी एकेरी प्रवासाचे तिकीट काढून प्रवास करतात. एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्यास या प्रवाशांकडून स्मार्ट कार्डचा वापर केला जाण्याचा अंदाज आहे. परिणामी टिकटासाठी लागणारा कागद व इतरखर्च कमी होईल असे सांगितले जात आहे. मुंबई उपनगरीय सेवेला वर्षाला तीन ते चार हजार कोटी रुपयांचा तोटा होत आहे . तोटा कमी करण्यासाठी हा पर्याय शोधण्यात आला आहे.
असे असले तरी खर्च कमी करण्यासाठी लोकल रेल्वे अनेक उपाय शोधत असते. प्रवाश्यांच्या खिशाला कात्री लावणारा हा पर्याय इतर पर्याय उपलब्ध असताना नक्की ह्याच कारणासाठी घेतला जातोय काय की अजून वेगळे कारण आहे? डिजिटल पर्यायही उपलब्ध आहेत तरीही हा उपाय करून खर्च व तोटा कमी होणार का? प्रवाशांना जास्तीचे पैसे देऊन केलेला प्रवास सुखावह होणार काय ? आणि वाढीव तिकीट केल्याने लोकलला होणारी गर्दी नियंत्रणात येणार काय की खाजगी करणाच्या दिशेने टाकलेले हे छोटेसे पाऊल आहे? असे प्रश्न सतत सामोरं येतात.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम.कृष्णा यांचे जावई व सीसिडीचे मालक व्ही. ....
अधिक वाचा