ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत लोकलचे २ हजार ७०० बळी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत लोकलचे  २ हजार ७०० बळी

शहर : मुंबई

        मुंबई – दिवसेंदिवस मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांची वाढणारी गर्दी आणि त्यातच प्रवाशांच्या अपघाती मृत्यूंमध्ये होणारी वाढ पाहता मुंबई विभागात मागील वर्षात म्हणजे २०१९ मध्ये एकूण २७०० प्रवासी मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. २०१५ च्या तुलनेत लोकल प्रवाशांच्या मृत्युमध्ये १९ टक्क्यांनी घट झालेली आहे.  


       दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू असतांनाही रेल्वे प्रशासन रेल्वे रुळाभोवती भिंती उभारण्याचे, तारा लावण्याचे काम करत आहे. तरीही रेल्वे रूळ ओलांडताना आणि रेल्वेतून जवळपास ६०० प्रवाशांच्या मृत्यु झाल्याची माहिती रेल्वे अधिका-यांनी दिली आहे.


         यात कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूरपर्यंतचा समावेश कल्याण रेल्वे पोलीसांच्या हद्दीत आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर दहिसर ते राम मंदिरपर्यंतच्या प्रवाशांचा समावेश आहे. यात सुमारे ३३१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बहुसंख्य प्रवाशांना लोकलचा आधार सोयीस्कर वाटत असल्याने प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न करताना दिसून येत आहे.

 
         त्यातच एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे लोकलमधून पडून मरण पावणा-या प्रवाशांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात चार एसी लोकल आहेत. सेमी एसी लोकलही प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे अधिका-यांनी दिली आहे. त्यामुळे अपघातांची वाढती संख्या पुढील येणा-या वर्षांत अजून कमी होईल तसेच प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.    


 

मागे

अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा
अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा

         नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या भी....

अधिक वाचा

पुढे  

ऑस्ट्रेलियात १० हजार उंटांची हत्या
ऑस्ट्रेलियात १० हजार उंटांची हत्या

      मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली भीषण आग अजूनही उग्र रूप धा....

Read more