ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2020 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

शहर : मुंबई

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिल्लीत दर दिवशी हजारो लोकांना कोरोनाची बाधा होत आहेत. तर दिल्ली पाठोपाठ मुंबईची परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मुंबईत दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर मुंबई लोकल ही सर्वसामान्य जनतेसाठी सुरु केली, तर त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सामान्यांसाठी पुन्हा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितलं जात होतं.

मात्र कोरोनाचा वाढता आकडा, लोकलमध्ये गर्दी, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यांसह अनेक कारणामुळे लोकलचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे.

मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. सध्या तरी, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मुंबईत काल कोरोनाचे 1092 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर  1053 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 9325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ

16 नोव्हेंबर – 409

17 नोव्हेंबर – 541

18 नोव्हेंबर – 871

19 नोव्हेंबर – 924

20 नोव्हेंबर – 1031

21 नोव्हेंबर – 1092

मागे

मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आह....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक, कोरोना रुग्ण, लॉकडाऊन, लस वितरण यावर चर्चा
पंतप्रधान मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक, कोरोना रुग्ण, लॉकडाऊन, लस वितरण यावर चर्चा

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे पाहायला मिळ....

Read more