ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

31 मार्चपर्यंत मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 10:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

31 मार्चपर्यंत मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद

शहर : मुंबई

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. भारतातही हा विषाणूने आपले पाय पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार या विषाणूशी लढा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजेपासून ते 31 मार्चपर्यंत मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी हे निर्देश जारी केले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी कमी करणे हे सर्वात मोठं शस्त्र आहे. त्या पार्श्वभूमीवर आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. ही पथकं आयकार्ड पाहून लोकल स्थानकांवर प्रवेशासाठी देणार परवानगी दोणार, अन्यथा प्रवास करण्यास बंदी असेल. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर या पथकांची नियुक्ती करण्यात येईल, असंही आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितलं.

पथकामध्ये कोण असणार?

रेल्वे पोलीस -1

राज्य पोलीस – 1

महसूल विभागाचा – 1 प्रतिनिधी

वैद्यकीय कर्मचारी – 1

आज जनता कर्फ्यू

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना टाळं असणार आहे.

 

मागे

BSNLकडून Work@Homeसाठी खास प्लान, ग्राहकांना मिळणार 'ही' सवलत
BSNLकडून Work@Homeसाठी खास प्लान, ग्राहकांना मिळणार 'ही' सवलत

कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक मह....

अधिक वाचा

पुढे  

इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल
इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल

आज जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. अनेक जण वेगवेगळ्या देशांमध्ये फ....

Read more