ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mumbai Local Train | लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच:उद्धव ठाकरे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 26, 2021 07:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Mumbai Local Train  | लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच:उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत होता. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे. मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामन्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत.

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करावी अशी मागणी केली जात होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकलमध्ये काही ठराविक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत लोकलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान आज (25 जानेवारी) मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड,  बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह,  यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

यावेळी मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईकरांची लाईफलाईन सर्वांसाठी सुरु होणार असल्याचे बोललं जात आहे.

 

मागे

Farmers Protest : हजारो आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेने
Farmers Protest : हजारो आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेने

नाशिक शहरातून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो आदिवासी शेतकरी मुंबईच्या द....

अधिक वाचा

पुढे  

अभिमानास्पद… गडचिरोलीच्या 12 पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर
अभिमानास्पद… गडचिरोलीच्या 12 पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असून सर्व....

Read more