By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 04, 2020 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील सांताक्रूझमधील आग्रीपाडा वाकोला परिसरात नाल्यातून वाहून जाणाऱ्या एका चिमुकल्याला वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिकाने प्रसंगावधान दाखवून नाल्यात उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं. तर तीन जण गेले वाहून ,या मुलाला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाकोल्यातील आग्रीपाडा इथल्या त्रिमूर्ती चाळीत नाल्याला लागूनच दुमजली घर होतं. मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हे घर कोसळलं. घरात पाणी घुसल्याने चिमुकला पाण्याच्या प्रवाहासह वाहून गेला. मुलगा नाल्यातून वाहून जात असल्याचं लक्षात येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु झाला. त्याचवेळी तिथे असलेल्या एका तरुणाने नाल्यात उडी मारली आणि वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवलं.
मुंबई आणि उपनगराला कालपासून सुरु असलेल्या पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तर आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोरोनाव्हायरस संसर्गाची दुसरी लाट भारतात दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झा....
अधिक वाचा