By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 07:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली आहे. निर्देशांक ११०० अंशाने कोसळला आहे. तर निफ्टीतही ३०० अंशाची घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. कोरोनाच्या काळात शेअर बाजारात मंदीच दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक कंपन्यांना फटकाही बसला आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
जागतिक बाजारात सुरु झालेल्या पडझ़डीचे परिणाम आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजरात बघायाला मिळाले. सेन्सेक्स जवळपास अकराशे अंकांनी कोसळून बंद झाला. तर निफ्टीमध्येही ३२६ अंकांनी आपटून बंद झाला. जगभरातल्या प्रामुख्यानं युरोपियन देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे.त्याचेवळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत होऊ घातलेल्या चुरशीमुळे आशियाई आणि युरोपियन बाजारातील गुंतवणूकदारांचा मिळालेला नफा काढून घेण्याकडे कल आहे. त्यात भारत आणि चीनमध्ये दिवसेंदिवस वाढणारा तणावही काही प्रमाणात बाजाराच्या पडझडीला जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कृषी विधेयकानंतर आता कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकारला का....
अधिक वाचा