By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 26, 2021 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. आता मुंबईचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखर होणार आहे. कारण मेट्रो- 2A आणि मेट्रो 7 मार्गावर काही ठिकाणी 31 मे पासून मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.(Mumbai Metro Trial run) या मार्गावरील काही काही ठिकाणी OHE-overheads wireमधून 25,000KV क्षमतेचा विद्युत पुरवठा सुरु करत तपासला गेला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मेट्रो-2 Aच्या दहिसर - कामराज नगर आणि चारकोप डेपो मार्गावर तर मेट्रो 7 च्या आरे ते दहिसर मार्गावर मेट्रोच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
मुंबईकरांना 31 मे रोजी मोठे मेट्रो (Mumbai Metro) गिफ्ट मिळणार आहे. अखेर मुंबईकरांसाठी मेट्रो- 2A आणि मेट्रो-7 हे (Metro-2A and Metro-7 routes) मार्ग सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. या मार्गावर आता चाचणी घेण्यात येणार आहे. याआधीच मेट्रोचे कोचेस मुंबईत दाखल झाले आहेत. दहिसरला मेट्रोचे कोचेस दाखल झाले आहेत.
दहिसर-अंधेरी (Metro-7) आणि दहिसर-डी एन नगर (Metro-2A) या मार्गिकांसाठी ट्रायल रन होणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी ट्रायल रन सुरु होत आहे. एकूण 576 कोचेस टप्प्याटप्याने मुंबईत दाखल होत आहेत. या दोन्ही मार्गावरची मेट्रो ड्रायव्हरलेस असेल. मात्र सुरूवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरु होईल. भारतातच मेट्रो कोचेसची बांधणी होत असल्यामुळे प्रत्येक कोचमागे दोन कोटी रुपये वाचले आहेत.
मे अखेरीस मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावेल, असे सांगण्यात आले होते. त्याची पूर्तता राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ड्रायव्हरलेस मेट्रो मुंबईत धावणार आहे. सुरुवातीला चालक असेल. मात्र, आधुनिक तंत्राचा वापर करुन भविष्यात ही विनाचालक ट्रेन चालवली जाणार आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए साठीच्या ट्रायल रनसाठी याआधीच बंगळुरुहून मेट्रो ट्रेन्स मुंबईत दाखल झाली आहे.
फी साठी विद्यार्थ्यांना तगादा लावणाऱ्या शाळांच्या अनेक तक्रारी पाहायला....
अधिक वाचा