By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 05, 2020 10:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अनलॉकच्या दुकऱ्या टप्प्याअंतर्गत शुक्रवार (आज)पासून बाजारपेठा गजबजणार असल्यामुळं शुक्रवारची सकाळ ही महाराष्ट्र आणि मुंबईकरांसाठी एक नवी सकाळ ठरणार आहे. Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळासाठी देशाप्रमाणेच राज्यातही लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं. ज्यानंतर आता धीम्या गतीनं का असेना पण राज्याचा मंदावलेला वेग पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली आहेत. त्यातीलच एक पाऊल म्हणजे, 'पुन:श्च हरिओम'.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'पुन:श्च हरिओम' अशी साद देत एका सकारात्मक दृष्टीकोनासह 'मिशन बिगिन अगेन', अंतर्गत लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देत असल्याचं सांगितलं. ज्या आधारे मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत. परिणामी या भागात प्रवास करण्यासाठी आता कोणत्याही पासची गरज नसणार आहे.
राज्य सरकारकडून नियमांमध्ये आणलेल्या शिथिलतेच्या बळावर आता बाजारपेठांमधील दुकानंही सशर्त सुरु होणारम आहेत. मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता बाजारपेठांमधील दुकानं ही सम- विषम तारखेच्या तत्वावर सुरु राहतील. कपडे खरेदीसाठी गेल्यास अशा दुकनांमध्ये ट्रायल रुमचा वापर मात्र करता येणार नाही. थोडक्यात निर्मनुष्य पडलेलं बजारपेठांचं चित्र आजपासून बऱ्याच अंशी बदलेलं असणार आहे.
कार्यालयांमध्येही दिसणाऱ कर्मचाऱ्यांची उपस्थिती
खाजगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ८ जूनपासून खाजगी कार्यालयांमध्ये १० टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने खाजगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
जॉगिंगसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी
कोणत्याही प्रकारच्या व्यायामासाठी बाहेर पडलं असता ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत. ज़ॉगिंगसाठी सहजपणे घराबाहेर पडणं शक्य होणार आहे. राज्य सरकारकडून याव्यतिरिक्त वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण ७ जूनपासून सुरु करण्याचीही परवानगी दिली आहे.
देशावर कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाऊन जारी करण्यात आला. अनेक उद्योग-धंदे बं....
अधिक वाचा