ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"माणुसकीचा फ्रीज", घरातील अतिरिक्त खाद्य द्या, भुकेल्यांनी घेऊन जा, मनसेचा अभिनव उपक्रम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 02, 2020 11:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

लाखो लोकांना दोन वेळचं अन्न देणाऱ्या मुंबईसारख्या शहरात हजारो लोक उपाशीपोटी झोपतात. हाती काम नाही किंवा माणसिक आजाराने ग्रस्त असलेले अनेक लोक आपल्याला मुंबईत उपाशी असलेले पाहायला मिळतात. काही संवेदनशील लोक त्यांना अन्न देतातही. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांना “माणुसकीचा फ्रीज”द्वारे काहीसा आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

कुणीही उपाशीपोटी झोपू नये या हेतूने मनसेकडून ‘माणुसकीचा फ्रीज’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत माहिमधील शितलादेवी मंदिर मार्ग परिसरातील पिंटो मॅन्शन येथे मनसेच्या कार्यालयात या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. गरीमा फाऊंडेशन, आपलं माणूस प्रतिष्ठान आणि NESHच्या सहकार्यानं मनसेकडून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

                                                                 

‘कोणीही उपाशी पोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेने आम्ही एक उपक्रम सुरु करत आहोत. आमच्या माहीम आणि दादरच्या कार्यालयात एक फ्रीज ठेवणार आहोत. नागरिकांनी आपल्या घरातील अतिरिक्त अन्न, फळे, ब्रेड, बिस्कीट किंवा अन्य कोणत्याही खाण्यायोग्य वस्तू या फ्रीजमध्ये आणून ठेवाव्यात. जो भुकेला असेल त्याने हे पदार्थ घेऊन जावेत’, अशी ही संकल्पना असल्याचं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

                                                                

‘माणुसकीचा फ्रीज’ हा उपक्रम सुरु केल्यानंतर मनसेकडून एक चित्रफित जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये नितीन सरदेसाई यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर भुकेले लोक या फ्रीजमधून खाण्यासाठी अन्न घेऊन जात असल्याचंही या चित्रफितीत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही या उपक्रमाला मोठी दाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मागे

नाशिकचे डॅशिंग ट्रॅफिक एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी सेवानिवृत्त, वायरलेसवरुन निरोप घेताना भावूक
नाशिकचे डॅशिंग ट्रॅफिक एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी सेवानिवृत्त, वायरलेसवरुन निरोप घेताना भावूक

नाशिकचे डॅशिंग ट्रॅफिक एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी सेवानिवृत्त झाले. सेवानि....

अधिक वाचा

पुढे  

मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार
मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार

वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्‍या मराठा विद्यार्....

Read more